(जपान मध्ये नुकताच भूकंप आणि त्सुनामीमुळे जो कहर झाला त्यावर आधारित काही ओळी)
प्रेमळ धरणी , काय म्हणुनी , संतप्त इतकी झाली ?
खवळला सागर , ग्रासले नगर , दैना अजुनी झाली.
प्रगती पथावर होतो आम्ही , कौतुक होते अम्हास याचे
काय खुपते मातेस अमुच्या , भान नव्हते अम्हास त्याचे
गुन्हा ठरवावे याला केवळ , चूक का इतकी मोठी झाली ?

जीवन व्हावे सुखकर म्हणुनी , थोडासाच घातला होता घाव
ठाऊक जरी होते अम्हा , याचेच निसर्ग ऐसे नाव
निसर्गास वरदान म्हणावे , तर शापवाणी कैसी झाली ?

पुराणात वर्णिले ज्याला , त्याच प्रलयाची हि का नांदी ?
पंचभूतांनी बनली सृष्टी , हि धरा तर त्याची फांदी
पंचभूतांहुनी श्रेष्ठ झालो , ऐसी तुलना तरी कैसी झाली ?

~योगेश