पहाट
धुके असे घनदाट , त्यात ना दिसे कुणा ही वाट
अभ्रास सारुनी बाजूस पाहते , अलवार लाजरी पहाट
खातर होता मनास पूर्ण , तिज ना पाही कुणाची नजर
अल्हाद पाउल ठेवीत चाले , शोधीत वाट तयातुनी धुसर
वृक्षांची दाट रांग चुकविता , सामोरी दिसे डोह अथांग
संकोच सोडूनी त्यात शिरे ती , सचैल भिजे तिचे सकलांग
कळू न देता कुणास होई , दिनचर्या सुरुवात
धुके असे घनदाट , त्यात ना दिसे कुणा ही पहाट
- योगेश