मोहक अदा , मन झाले फिदा
भिरभिरतो श्वास तुजभोवती सदा
बांधुनी चाळ , फुलांची माळ
मज वेड लाविते काय ही नशा
पदराचा रंग अजून खुलतो ,
वाऱ्यास ही ना हाती लागतो
नाद मंजुळ करीत कंकण ,
हृदयास माझ्या साद घालतो
थिरकतो ताल , आरक्त गाल
भिरभिरतो श्वास तुजभोवती सदा
बांधुनी चाळ , फुलांची माळ
मज वेड लाविते काय ही नशा
पाउले ना जरा ठहरती
विजांचे कल्लोळ उमलती
रुणझुण घुंगुर मिळून सारे
जणू माझेच गीत बोलती
एक अंगार , ल्याला शृंगार
भिरभिरतो श्वास तुजभोवती सदा
बांधुनी चाळ , फुलांची माळ
मज वेड लाविते काय ही नशा
- योगेश
No comments:
Post a Comment