वहीच्या पानांत
एक मोरपिस जपुन ठेवणार आहे
एक छोटेसे प्रतिक म्हणुन
आजच्या उमेदीचे,
मोरपिशी तारुण्याचे
आणि चेहऱ्यावर
हळुवार फिरवताना झालेल्या स्पर्शागत
मखमली प्रेमाचे
दिवस रोज सरताना
कदाचित कधितरी
मी ते पिस परत पाहीनही
तेव्हा नक्किच दाटुन येतील
काही नाहीश्या झालेल्या भावना
आणि...
त्या पिसासारख्याच
दबलेल्या आठवणी
परत परत पाहणे
शक्य जरी नाही झाले
तरी एक मात्र नक्की आहे
मी
कधितरी
एकटाच निघुन जाईन
माझ्या आठवणींना न घेताच
त्या कुठे असतील
मलाही माहीत नाही
पण
मोरपिस....?
ते तसच राहील
कोंडुन ठेवल्यासारखं....
~योगेश
No comments:
Post a Comment