लवकर येतो म्हणूनही तो काल उशिराच आला...
त्याची वाट बघण्यातच झालेलं जागरण...
डोळ्यांखाली काळी वर्तुळही झालीत ...
हि गर्दी अजूनही ढिम्मच...
पियुला सकाळीच कसबसं तयार केलंय
ऐकताच नव्हती अगदी
दोन फटकेही द्यावे लागले
फारच रडत होती............
हल्ली शाळेत जाताना फारच दंगा करते
...लहान आहे अजून
होईल शांत हळूहळू
पण ......तोपर्यंत माझं काय?
सकाळी सकाळी त्याचं आवरून द्यायचं
शेवटी घाई झालीच ना...
इथे तर एवढी गर्दी जमलीय
हि ऑडिशन तरी व्यवस्थित व्हायला हवी
हि जाहिरात मिळायलाच हवी
ती तर फारच भाव खातेय
खाणारच म्हणा
अलीकडे फारच चलती आहे तिची
पाच सहा वर्षांपूर्वी माझ्यापुढे उभी सुद्धा नसती राहिली
गर्दी काहीच कमी होत नाहीये अजून
हल्ली जी उठते ती मॉडेल व्हायला येते.
फारच उशीर झालाय आता
घाई गडबडीत काही खाल्लेलंसुद्धा नाही सकाळी
पियुची शाळेतून यायची वेळ सुद्धा होत आलीये
..माझी ऑडिशन आज चांगली व्हायलाच हवी
घड्याळ काही थांबत नाही
ती आली असेल शाळेतून
काकूंना सांगितलंय
आजच्या दिवस तेवढं ठेवा तिला
त्यांनाही त्रास होतोय
पाळणाघराशिवाय पर्याय नाही
..हो.त्याला आवडत नसलं तरीही
येईलच आता माझा नंबर
एकदा फोने करावा का तिला
.....
........
छे..फारच रडते आहे.
सांगूनही काही ऐकत नाही.
'तू लवकर घरी ये' एवढंच म्हणतेय.
काकुनांही फारच त्रास....
शेवटी ज्याची भीती होती तेच झालं.
चेहऱ्यावर एक्स्प्रेशंस येत नाहीत म्हणे
मला तर जगणंच नको झालंय
नुसतंच अडकून पडले आहे
आता निदान घरी तरी लवकर जायला हवं.
जाहिरात काय??? तिलाच मिळणार.
लिफ्टसुद्धा नेमकी आजच बंद
काकू प्लीज दरवाजा उघडा लवकर
'पियू पियू...बाळा काय झालं?
आता आलेना मी....रडायचं नाही.
गालपण बघ किती लाल झालेत.
रडू नको बाळा ....
आता कध्धी कध्धी नाही जाणार हां तुला सोडून'
आणि बाळाच्या इवल्या मिठीत
तिच्या डोळ्यांचा बांध कधी फुटला
तिचं तिलाच कळालं नाही
अपयश , इर्षा , चिडचिड ..सगळं वाहून चाललं होतं
तिथे उरली होती फक्त एक आई .......
आपल्या बाळाच्या मिठीत.
************
योगेश
Baprey!!
ReplyDeletekay danger lihitos tu?
जबरद्स्त रे भावा....
ReplyDelete