मुखी आळवूया विठ्ठल
हरिनामाचा झेंडा घेवूनी हाती , मुखी आळवूया विठ्ठल
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल ||धृ ||
शब्दा मिळवूनी शब्द , जुळुनी यावा भाव अंगी
टाळा भिडवूनी टाळ , रंगुनी जावे पांडुरंगी
हरीचे कीर्तन श्रवण करोनी , मुखी आळवूया विठ्ठल ||१||चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल ||धृ ||
शब्दा मिळवूनी शब्द , जुळुनी यावा भाव अंगी
टाळा भिडवूनी टाळ , रंगुनी जावे पांडुरंगी
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल
पाउल जुळवुनी पाउल , चालुनी जाऊ वाट मोठी
संतांची वाणी गाऊन , अभंग खेळवू ओठी
धुलीसम राहुनी तेथे चरणी , मुखी आळवूया विठ्ठल ||२||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल
आप पर भाव जावो निघोनी , दिसो तुझ्यातला विठ्ठल
सगुण निर्गुण म्हणती जयाला , कळू दे अम्हांस तो विठ्ठल
तोवर चरणी मिठी मारोनी , मुखी आळवूया विठ्ठल ||३||
चराचरी जो वसला येथे , जाणू मिळोनिया विठ्ठल
~योगेश
शेवटी तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे
बोलिली लेकुरे , वेडी वाकुडी उत्तरे ||
क्षमा करा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध||
नाही विचारिला , अधिकार मी आपुला ||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा , राख पायापैं किंकरा ||
good one yogya ...... solid jamali aahey :)
ReplyDeleteयोगेश २ - ४ ओळी सूचल्या आहेत सदगुरू चरणी ...
ReplyDeleteसदगुरू-कृपे योग येईल जुळूनी , मनीचे मलभ जाईल जळूणी ||१||
कृपा करी रे गुरुराया , भवसागर हा तराया ||२||
सदा माझी दृष्टी राहो तुझीया समाचरणि ||
तुझीया वीणा कोण करी भवबंधणातुनी मुक्ती ||३||
लावी ऐसे वेड, मति गुंग होय, माझी हरिनामी ||४||
विठ्ठल नामी होवू दंग, गाऊ तुकयाचे अभंग ||१||
ReplyDeleteकरू हरी नामाचा जागर, लूटू भक्तीचा सागर ||२||
विसरूनी सारे मी-तू पण , लेउ नामाचेच लेणं ||३||
पांडुरंग पांडुरंग , आळ्वु सारे वैष्णव वीर ||४||
sunil far sundar abhang suchale aahet. gaayla maja yeil nakkich
ReplyDelete