विजय रात्रीच्या वेळी निघाला होता. गाव अजून दूर होते. झपाझप झपाझप पाऊले पडत होती ... जणू काही जमिनीवरून नुकताच कात टाकलेला साप जात होता. किर्र रात्र, आवाज केल्याशिवाय ऐकू येणार नव्हता अशी वेळ. कदाचित याचीच भीती पाउलांना होती म्हणून मध्ये मध्ये पाला पाचोळा उडवून साथीचा दिलासा स्वतालाच देत होती. विजयाला काही सुचत नव्हते, कुणी तरी त्याचा पाठलाग करत aahe असे त्याला निघाल्या पासून वाटत होते. मागे वळून बघायची भीती वाटत होती, म्हणून शबनम मध्ये असलेला आरसा मध्ये मध्ये समोर घेऊन मागे कुणी आहे का हे बघायचा.
एवढ्या कडकाच्या थंडीत पण त्याला घाम घाम फुटला. मनाच्या कल्पनेची शक्ती शरीराच्या शक्ती पेक्षा कैक पतीने जास्त असल्याचा हाच एक पुरावा होता. तो जितका जोरात चालत होता तितकेच मन मात्र गावी पोचून कधी एकदा शरीर येते आणि ते झोपते असे झाले होते. वेळ पुढे जात होती, पाला पाचोळा पण साथ देई नासा झाला. पावला मध्ये आता मातीची ढेकळ लागत होती आणि फुटत होती. क्षण भर त्याला फाटत आहेय का फुटत आहे हेच कला नव्हते. त्याचा वेग यामुळे मंदावला. कधी पासून तो याच संधीची वाट बघत होता. विजयाला एका आवाजाचा भास झाला. त्याने आरसा उचलला आणि प्रयत्न केला मागे काही आहे का बघण्याचा..... आरशात बघितले तर मागे त्याला ओलसर काही तरी दिसले. त्याला धडकीच भरली. रडावेसे वाटत होते पण, वय आणि विजन शांतता ते होऊ देत नव्हते. त्याने रुमाल काढला आणि चेरा पुसला. आता मात्र आरशात स्पष्ट मागचे दिसायला लागले. मागे तेव्हा तरी काहीच नव्हते. रुमाल मात्र ओलाचिंब झाला होता. ढेकळ पण संपली होती. पुन्हा एकदा त्याला वेग सापडला.
अंधाराने आता पूर्ण काळी घोंगडी पांघरली. विजयाचा धीर सुटायला लागला. त्याने ठरवले कुठेतरी विसावा घ्यावा. तो योग्य जागेची वाट बघत जात होता. तेवढ्यात एक वटवाघूळ ओरडत जवळून गेले. ढास !!! त्याला यमदूत बघून गेल्याच भास झाला. मागे न बघतच त्याला लक्षात आता वटवाघूळ काहीतरी दिसले नि ते जमिनीवर पडले. त्याला पहिल्यांदा वटवाघूळ सरळ आडवे झालेले दिसले. आता मात्र विजयची नजर वायू वेगाने आधार शोधायला लागली. भुकेल्याला आणि भीतीला देवाने तीक्ष्ण कानांचे वरदान दिलेले असते असे म्हणतात. लांब कुठे तरी कुत्रे भून्क्लेले त्याने ऐकले आणि तो जवळ पास पळतच निघाला. त्याला कुत्राची पण भीती या वेळी छोटी वाटत होती
हळू हळू कुत्र्याचा आवाज जवळ आला. या आवाजामुळे त्याला जिवंत असल्या सारखे वाटले. इतर वेळेला मार्ग बदलणारा विजय आज कुत्र्याच्या दिशेने जात असलेला बघून, कदाचित तो श्वान भुंकत नसून हसत आहे असेच नियतीला वाटले असेल. आज विजयची खात्री पटली माणूस हा प्राणीच आहे. संगत नसेल तर आयुष्याची पंचापाक्वन्नाची पंगत पण उकीरड्या सारखी वाटते. तिथे एक मंदिरासारखे दिसले. विजयाला आता त्या श्वानात साक्षात गुरु भेटल्याचा आनंद झाला नि भीती पळून गेली.
तो पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात गेला आणि पहुडला. पायांची यंत्रे थांबल्याने त्याचा डोळा हळू हळू लागायला लागला आणि तेवढ्यात ........... त्याला कुत्र्याची आर्त किंकाळी ऐकू आली आणि तो घाबरून उतला आणि त्या कुत्र्याच्या दिशेने पाळला पण मंदिराची शेवटची पायरी ओलांडायचे धाडस त्याच्या मध्ये नव्हते. ते कुत्रे केविळवाणे आवाज काढत मरता मरता विजय कडे बघत शेवटचे ओरडले. आता मात्र विजयाचा ताबा गेला आणि तो ढसाढसा रडायला लागला. त्या अंधाऱ्या जगात कुत्रा क्षणभर नाते निभावून गेला. विजय थरथर कापायला लागला आणि तो गाभाऱ्याच्या दिशेने पळाला. तो दार उघडणार तोच दारानेच वाऱ्याच्या मदतीने त्याला वाट दिली. तो धापा टाकत आत एका दगडावर आपटला आणि तिथे एक पाटी दिसली - ' हि जागा नियोजित दशक्रियाविधीकरता राखीव आहे. तरी याचा वापर विश्रामाकरता करू नये. ' विजयचे डोळे भिरभिरायला लागले आणि त्याला अजून एक पाटी दिसली. - 'सल्ला ऐकला असता तर .........' आणि तर शब्दातील र ची रेघ फरफटत खालपर्यंत आली होती. जणू कोणी मरणप्राय वेदनेने सांगत होते - ''सल्ला ऐकला असता तर ......... '. त्याला त्याचा बोध झाला नाही पण त्याने तो बाधला. त्याने ठरविले कि इथून पळायचे.
तो जोरात सुटला, चालत म्हणा किंवा पळत म्हणा. त्याला लहानपणापासून जेवढी स्तोत्रे येत होती तेवढी तो मोठ्याने म्हणत निघाला. पहिल्यांदा त्याला बरे वाटले, पण नंतर तो स्वताच्याच आवाजाला घाबरायला लागला. अजून अंधार गुडूप होतेच. त्याच्या वेगामुळे त्याला गावाकडे जाण्यापेक्षा जणू गावच इकडे येत येत असल्याचा भास होत होता. जसे पाय हवेत आहेत नि जमीन जोरात मागे सरकती आहे. एवढ्या वेळच्या अथक भीतीपोटी तो दमला होता शरीराने पण आणि मनाने तर जास्तच.
त्या डोळ्यावर झापड होती. माणसाला जेव्हा अशी झापड येते, तेव्हा अनुभव मात्र डोळ्या समोर नंगा नाच करत असतो. त्याला कळलेच नाही तो कधी झोपला आणि त्याने डोळे उघडले तेव्हा त्यांनी बायको त्याच्या डोक्यावरची दुधाची पट्टी बदलत होती. ती म्हणाली - 'धनी एवढ्या तापत कशाला यायचे. कुठे तरी आराम करायचा'. त्याने तापतच सगळा अनुभव तिला सांगितला पण त्या अर्धवट पाटी बद्दल तो काही नाही बोलला. राहून राहून त्याच्या नजरे समोर ''सल्ला ऐकला असता तर .........' हीच अक्षरे पुन्हा पुन्हा दिसत होती. आता बायकोला ऐकून घाम फुटला. तिने प्रेमाने धन्याला भाळी चुंबन दिले आणि म्हणाली त्यापेक्षा माझा सकाळीच येण्याचा 'सल्ला ऐकला असता तर ..........'. आणि पुन्हा विजयाला भोवळ आली.
============================================
Vijay Albal
He he he
ReplyDelete